SALLUTE

सलाम....! मुंबई नाका पोलीस. पोलीस गाडीतून गर्भवती महिलेस हॉस्पिटल मध्ये पोहचविले.

लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका किती?

शिवाजीवाडी येथील महिलेस प्रसूती वेदना होण्याची माहिती मिळताच. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी शासकीय वाहन पाचारण करून त्या महिलेला व तिच्या नातेवाईकांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. साधारण मध्यरात्री १२ च्या सुमारास हि घटना घडली.  या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

मध्यरात्री साधारण १२.३० वाजेच्या सुमारास मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीवाडी, भारत नगर येथे राहणाऱ्या गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या.

या महिलेस तातडीने रुग्णालयात पोहोचविणे आवश्यक होते.  जवळच्या नातेवाईकानी १०८ रुग्णवाहिकेची किंवा खाजगी वाहनाची मागणी केली. परंतु वाहनाची व्यवस्था होऊ शकली नाही. तसेच महिलेला प्रसूती कळेचा जोरदार त्रास होऊ लागला.  

त्यावेळी मुंबई नाका पोलीस स्टेशनची विनय नगर बीट  मार्शल व त्यावरील पो.हवा. संजय ,  पोलीस शिपाई अत्तार  तेथे पोहचले.

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ते मदतीला धावून आले. त्यांनी मुंबई पोलीस स्टेशन ची डी.बी. मोबाईलची मदत मागवली. यानंतर याठिकाणी गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवा. शिंदे, पोशि. मुंजाळ  हेहि त्वरित शासकीय वाहनासह भारतनगर येथे पोहचले.  

त्यांनी त्या महिलेला नातेवाईकांसह  नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.  या महिलेची सुखरूप प्रसूती झाली व तिने मुलाला जन्म दिला. बाळ आणि बाळाची आई दोघांची प्रकृती चांगली असून. नातेवाईकांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार  मानले.

कर्तव्य दक्षतेची पावती म्हणून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच पोलीस उप आयुक्त अमोल तांबे यांनी प्रत्येकी २ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 




Comments