आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनला खुले आव्हान.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला खुले आव्हान दिले. जर चीनने कोरोना व्हायरस जाणीवपूर्वक जगात पसरवला असेल तर त्यांना गंभीर परिणामाना सामोरे जावे लागेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले.
या सर्व प्रकरणाबद्दल जगभरातून चीनवर टीका होत आहे. तसेच आतापर्यंत चीनने कोरोना व्हायरस संदर्भात जी आकडेवारी जाहिर केली त्या आकडेवारीत कोठेही ताळमेळ आणि पारदर्शकता नाही. अशी शंका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शविली.
परंतु चीनने हे सर्व आरोप फेटाळून लावले. चीनने आमच्या वूहान येथील लॅबमधून कोरोना निर्माण झाल्याच्या आरोपाला स्पष्ट विरोध केला आहे.
लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका किती?
कोरोना व्हायरसने अमरिकेत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कोरोना व्हायरसने अमरिकेत मृतांचा आकडा ७ लाखाच्या वर गेला आहे.
कोरोना माहामारीचं केंद्र बनलेल्या न्यूयॉर्कमध्ये १४ हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 2 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शेजारील न्यूजर्सीमध्ये ८० हजारांहून अधिक कोरोनाबाधित असून ३९०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आतापर्यंत 37.8 लाखांहून अधिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही संख्या कोणत्याही देशात केलेल्या चाचण्यांपैकी सर्वाधिक आहेत. सर्वात प्रभावित असलेल्या न्यूयॉर्क, लुइसियाना या भागात इतर देशांच्या तुलनेत अधिक लोकांची चाचणी झाली. अमेरिकेत जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक मजबूत, प्रगत आणि अचूक चाचणी प्रणाली असल्याचं ट्रम्प त्यांनी सांगितलं.
Comments
Post a Comment