आयसोलेशन किंवा विलगीकरण, क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय?
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात आतापर्यंत हजारो रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललीय. चीन, इटली, इराण, युके, अमेरिकानंतर बघता बघता कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसताच संबंधिताला क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका किती?
आता भारतातही शेकडो नागरिकांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करुन ठेवण्यात आलंय. यात अधिक तर परदेशाहून भारतात परत आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. शिवाय, कोरोनाग्रस्त, कोरोनाची लक्षणं असलेले नागरिक, तसंच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना किमान 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत आहे.
'क्वारंटाईन' होणं म्हणजे काय?
क्वारंटाईन होणं म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. स्वत:चा संपर्क इतर सर्वांपासून काही कालावधीसाठी बंद करणं. वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला क्वारंटाईन होण्यास सांगितलं जाते. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणे म्हणजेच क्वारंटाईन होणं. क्वारंटाईला 'मेडिकल आयसोलेशन' असंही म्हटलं जातं.
क्वारंटाईन हा मूळ लॅटीन शब्द आहे. ज्याचा अर्थ चाळीस आहे. पूर्वी बाहेरच्या देशाहून आलेल्या जहाजांना चाळीस दिवस बंदरापासून लांब ठेवलं जात होतं. जहाजावरील सर्व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होत असे. जहाज रोगमुक्त आहे, असं जाहीर केल्यावर त्या जहाजाला बंदरावर येण्याची परवानगी दिली जात होती. पुढे प्लेग, कावीळ, ताप, त्वचेचे रोग, अशा संसर्गजन्य आजारासाठी रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था सुरू झाली.
क्वारंटाईन का केलं जातं?
कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका आहे.
मुंबईतले व्हायरॉलॉजीस्ट डॉ.अभय चौधरी सांगतात, "खोकल्यापासून बाहेर आलेले पार्टिकल्स 6 फूटापर्यंत असलेल्या व्यक्तीला संसर्ग करु शकतात. सहा फूटाअंतर्गत व्यक्ती असेल तर त्याला संसर्ग होऊ शकतो हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास त्यांचा संपर्क इतर कुणाशी झाल्यास संसर्ग वाढू शकतो. म्हणून त्रास होत असलेल्या व्यक्तीने वेगळं राहणं गरजेचं आहे."
"प्रत्येकालाच क्वारंटाईन व्हा असं डॉक्टर्स सांगत नाहीत. पण एखाद्याला त्रास होत असल्यास तो व्यक्ती घरच्याघरीही काळजी घेवू शकतो. कुटुंबीयांपासून सहा फूट अंतर ठेवावं. घरी वावरतानाही तोंडावर रुमाल बांधावा. आपलं साहित्य वेगळं ठेवावं."
तुम्हाला जर 'क्वारंटाईन' होण्यास सांगितलं तर?
- जर तुम्हाला ताप, खोकला,सर्दी अशी काही लक्षणं दिसून येत असतील तर सगळ्यात आधी डॉक्टरांना फोनवर संपर्क साधा.
- क्वारंटाईन होण्यासाठी तुम्हाला एका बंद खोलीत रहावं लागेल. ज्याचा दरवाजा बंद असेल, पण खिडक्या तुम्ही उघड्या ठेवू शकता.
- त्या खोलीच्या बाहेर शाळा, महाविद्यालय, कार्यालय कुठेही तुम्हाला जाता येणार नाही.
- तुम्हाला भेटायला येण्याची परवानगी कुणालाही नसेल. अगदी तुमच्या कुटुंबालाही नाही.
Comments
Post a Comment