लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका किती?
एका इंग्रजी वाहिनीवर रतन टाटा यांना एक प्रश्न विचारण्यात आला कि टाटा साम्राज्य १०० पेक्षा जास्त वर्षे भारतात कार्यरत आहे परंतू ५० वर्षेही न झालेला रिलायन्स गृप हा जास्त झपाट्याने प्रगती करून बाजारमूल्याच्या बाबतीत एक नंबरला पोहोचला आहे हे कसे काय? रतन टाटा यांनी त्वरित पण हसत हसत जे उत्तर दिले ते अनेक - अनेक पैलूंनी विचार करण्यासारखे आहे. टाटा म्हणाले कि, ‘Ambanis are true businessmen, h wever Tatas are true industrialists’. खरे तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे. टाटा हे उद्योजक आहेत आणि अंबानी व्यावसायिक.
Beyond the Last Blue Mountain नावाचे एक पुस्तक आहे ज्याचा मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्यापूर्वी मला टाटा समूहाविषयी आदर होता पण हे पुस्तक वाचल्यावर तो आदर हिमालयइतका मोठा झाला. ….. जरूर वाचा.
अंबानींनी प्रत्येक नवा उद्योग हा आपली संपत्ती वाढावी म्हणून सुरु केला पण जर तुम्ही टाटा उद्योगाचा इतिहास बघितलात तर असे दिसेल कि त्यांचे अनेक उद्योग हे सुरु होतानाच नुकसानीत जाणार हे दिसत होते पण देशहित म्हणून त्यांनी ते सुरु केले.
टाटा मोटर्स चे पहिले नाव होते टाटा लोकोमोटिव्ह अँड इंजीनियरिंग .. आगगाडीचे इंजिन आणि रूळ तयार करण्यासाठी हि कंपनी सुरु केली ती सुद्धा फक्त ३% ठोक नफ्यावर. त्यातही भारत सरकारने अनेकवेळा आपला शब्द फिरवला ज्यामुळे टाटांचे नुकसान झाले. जेव्हा भारत सरकारने चित्तरंजन लोकोमोटिव्ह सुरु केले तेव्हा मात्र टाटा या उद्योगातून बाहेर पडले आणि कंपनीचे नाव झाले टाटा इंजीनियरिंग अँड लोकोमोटिव्ह आणि आता टाटा मोटर्स. टाटांचा ट्रक हा १००% भारतीय बनावटीचा असावा असा हट्ट त्यांचा होता.
भारतीय जर लोखंड बनवणार असतील तर मला ते लोखंड फुटाणे म्हणून खायला आवडेल हे वाक्य ऐकल्यावर टाटांनी टाटा स्टील सुरु केली आणि हे वाक्य म्हणणाऱ्या विदेशी लोकांची मोठी कंपनी विकत घेतली.
BARC जे जनक टाटा. यातून काय नफा मिळणार होता ?
CSO हे जनक टाटा. यातून काय नफा मिळणार होता ?
जहांगीर आर्ट्स गॅलरी तर बरेच वेळा नुकसानीत जायची - काहीही नफा नाही.
भारतात सुपर कॉंप्युटर देण्यास अमेरिकेने नकार दिल्यावर टाटांनी एक महासंगणक तयार करून भारत सरकारला दिला - मार्जिन फक्त ३%. काय नफा मिळाला हे करून ?
टाटांचा एक अपमान झाला म्हणून जुने हॉटेल ताज उभे राहिले. इंडियन हॉटेल्स चा इतिहास वाचा.
टाटा केमिकल्सचा इतिहास वाचा. सयाजीराव गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन हि कंपनी सुरु झाली जी अनेक वर्षे नुकसानीत गेली.
इंडियन एअर लाईन्स चा इतिहास वाचा. टाटा साम्राज्यावर किती अन्याय भारत सरकारने केला आहे पण टाटांनी आपला आदर्शवाद बदलला नाही.
अजमल कसाबच्या हल्ल्यात ताज हॉटेलच्या व्यवस्थापकाची पत्नी आणि दोन्ही मुले बळी पडली त्या व्यवस्थापकाला नंतर कशी सन्माननीय वागणूक मिळाली. आणि अंबानींच्या पाताळगंगाच्या कारखान्यात स्फोट झाल्यावर अनेक माणसे त्यात बळी पडली त्यांचे काय झाले हे तुम्हाला त्यांचा एखादा कर्मचारीच सांगू शकेल. आणि म्हणूनच,
टाटा हे उद्योजक आहेत आणि अंबानी व्यावसायिक..!
Feeling proud...
ReplyDelete