आई तुळजा भवानीला शरण आलेल्या कर्नाटकातील ‘ २१ एकवीस कन्या ‘ सुरक्षित.
कोरोनामुळे झालेल्या लाँकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील काम बंद पडल्याने पायी चालत तुळजापूरकडे येणाऱ्या “कर्नाटक” राज्यातील एकवीस मुलींना तुळजभवानी मंदिर प्रशासनाने आपुलकीने विचारपुस करुन त्यांना ताब्यात घेऊन मंदिराच्या निवारागृहात त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे.
मंदिर प्रशासनाने परराज्यातील मुलींसाठी दाखवलेल्या माणुसकी मुळे या मुली स्ञीशक्तीदेवता असणाऱ्या आई तुळजा भवानीच्या दारी सुरक्षित आहेत. या बाबतीत अधिक माहीती अशी आहे की कर्नाटकातील एकवीस मुले लातूर येथे खासगी कंपनीत कामाला होत्या. पण कोरोना मुळे काम बंद पडले.यामुळे घाबरलेल्या या मुलींनी टँम्पोतुन तुळजापूर मार्ग कर्नाटककडे जाण्याचा प्रयत्न केला. पण तुळजापूर जवळ पोलिसांची चेकपोस्ट टँम्पो दिसताच. उगीच लफडे नको म्हणून टंम्पो चालकाने मुलीना खाली उतरुन पळ काढला त्यानंतर या मुली तुळजापूरकडे चालत निघाल्याने मंदिर प्रशासनाला या मुलींची माहिती मिळताच त्यांनी आपुलकिने विचार पुस करुन चौकशी केली असता. काम बंद पडल्याने आपण गावी जाण्यासाठी निघाल्याचे या मुलींनी स्पष्ट केले.
लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका किती?
त्यामुळे या मुलींची तात्पुरती निवासाची सोय श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान संचलित श्रीतुळजाभवानी सैनिक विद्यालय या नव्याने तयार करण्यात आलेल्या निवारागृहात केली आहे.गेल्या पाच दिवसापासून येथे या मुली वास्तव्यास असुन तेथे त्यांना नाष्टा – भोजन सह करमणुकीसाठी कँरम टीव्ही दिला असुन त्यांना मुलभुत सुविधा पुरवल्या जात आहेत.या घाबरलेल्या मुलींची मानसिक स्थिती आणि आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून स्थानिक योग शिक्षक संजय बोंदर व त्यांची मुलगी श्रध्दा सकाळी मुलींना योगासने शिकवीत आहे.
सदरील मुलींना आम्ही लातूर रस्त्यावरून पायी चालत येत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी ताब्यात घेवुन त्यांना सर्वसुविधा पुरवल्या आहेत या मुली सुरक्षित असल्याने शासनाच्या निर्देशानंतर यांना येथेच ठेवायाचे कि गावी पाठववायाचे याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती तुळजापुरचे तहसिलदार सौदागर तांदळे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment